गुढीपाडवा

गुढीपाडवा





गुढीपाडवा
हा सण भारतातील हिंदू समाजातील लोकांचा सण आहे. प्रमुख्याने महाराष्ट्र राज्यातील हिंदू समाज गुढीपाडवा हा सण साजरा करतात. हिंदू कैलेंडरा प्रमाणे महाराष्ट्रात गुढीपाडवा  चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा करतात. हा गुढीपाडव्याचा पहिला दिवसशालिवाहन संवतपराचा आहे. वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा  सण साजरा करतात. या वर्षी २२ एप्रिल २०२३ ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे.संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गुडीपाडव्याचं मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. हिंदू समाज्याची पारंपरिक वेषभूषा करून, घरोघरी गुढी उभारली जाते. गुडी उभारताना मोठी काटी त्यामध्ये तांब्याचा तांब्या उलटा टाकून पाटावर रांगोळी काढून त्यावर गुडी उभारतात.

गुढीपाडवा का साजरा करण्यात येतो.

गुढीपाडवा हा सण का साजरा करण्यात येतो, त्या मागील काही पौराणिक गोष्टी आहेत. एका गोष्टी मध्ये म्हणतात की, देवाधीदेव महादेव आणि पार्वती मातेचे याच दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी लग्न ठरले होते. आणि तृतीय येला लग्न सोहळा संपन्न झाला.   आणि दुसर्या गोष्टी मध्ये गुडीपाडव्याला प्रभु श्री राम वनवासातुन परत अय्योध्या नगरीत परत आले.

गुढीपाडवा कधी साजरा करण्यात येतो.

गुढीपाडवा
गुढीपाडवा

 हिंदू कैलेंडरा प्रमाणे महाराष्ट्रात गुढीपाडवा  चैत्र शुद्ध प्रतिपदेला  हा सण साजरा करतात. हा गुढीपाडव्याचा पहिला दिवस शालिवाहन संवत्सराचा आहे. वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा  सण साजरा करतात.

गुढीपाडवा कोणता समाज साजरा करतो.

भारतातील हिंदू समाज गुढीपाडवा हा सण साजरा करतात.

कोणकोणती राज्य गुढीपाडवा साजरा करतात.

प्रामुख्याने महाराष्ट्रात राज्यात गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. या सणाला महाराष्ट्र मध्ये 'गुढीपाडवा' असे संबोधले जाते. तसेच इतर राज्यात सुध्दा गुढीपाडवा हा सण साजरा करतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक राज्यात आणि आंध्र प्रदेश अशा इतर भारतीय प्रांतांत चेटी चांद, उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी गुढीपाडवा ला ओळखतात.  आणि वेगवेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात येतो.

गुढीपाडवा चा महत्त्व

आज आपण २१ व्या शतकात राहत आहोत तरी सुद्धा आजच्या आधूनिक युगातही  गुढीपाडवा या सणाला ऐतिहासिक व सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. म्हणजे पौराणिक गोष्टी आहेत तरीही गुढीपाडवा हा सण आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. वास्तविक पाहता प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही पुर्वजांचे  उद्देश असतात. गुढीपाडव्याला चैत्र महिना चालू होतो. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे निसर्गामध्ये बदल झालेले असतात.म्हजेच  झाडांची जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पाल्लवी फुटते, आंब्याला मोहोर येतो. जातात. म्हणजेच गुढीपाडवाला  या  जुने वाद विसरून नव्याने एकत्र येऊन प्रगती काडे वाटचाल करायची आहे.

Previous Post Next Post