अखंड जया तुझी प्रीती ।
मज दे त्याची संगती ।
मग मी कमळापती।
तुज बा नानीं ।। १ ।।
पडोनी राहेन ते ठायीं।
उगा ची संताचीये पायीं।
न मगें न करीं काहीं
तुझी आण बा विठोबा ।।ध्रृ।।
तुम्ही आम्ही पीडों ज्याने ।
दोन्ही वारती एकाने
बैसलों धरणे ।
हाका देत दाराशीं ।। २ ।।
तुका म्हणे या बोला।
चित द्यावें बा विठ्ठला।
न पाहिजे केला।
आता माझा । । ३ ।।