अभंग
देवाचीये व्दारीं उभा क्षणभरी।
तेणें मुक्ती चारी साधियेल्या।। १।।
हरी मुखें म्हणा हरी मुखें म्हणा।
पुण्याची गणना कोण करी।। २।।
असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा।। ३।।
ज्ञानदेव म्हणे व्यासाचीया खुणा।
व्दारकेचा राणा पांडवां घरीं।। ४।।
संत ज्ञानेश्वर महाराज